Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

निरा खोऱ्यात दमदार पावसाची हजेरी, जलसाठ्यात वाढ




फलटण चौफेर दि १६ जून २०२५

निरा खोऱ्यात काल झालेल्या पावसामुळे चारही धरणांमध्ये पाणीसाठ्यात वाढ होत आहे. भाटघर धरण परिसरात 27 मिमी पावसाची नोंद झाली असून, धरणाचा सध्याचा साठा 1.789 टीएमसी आहे, जो एकूण क्षमतेच्या 7.61 टक्के आहे. नीरा देवघर धरण परिसरात 56 मिमी पावसाची नोंद झाली असून, धरणात 1.163 टीएमसी पाणीसाठा असून 9.91 टक्के भर आहे. वीर धरण परिसरात 10 मिमी पावसाची नोंद झाली असून, सध्या धरणात 4.372 टीएमसी पाणी असून 46.47 टक्के भर आहे. वीर धरणात सध्या 61 क्यूसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. गुंजवणी धरण परिसरात 72 मिमी पावसाची नोंद झाली असून, धरणात 0.875 टीएमसी पाणी असून 23.72 टक्के भर आहे.



चारही धरणांमध्ये काल दिवसभरात एकूण 0.077 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. सध्या चारही धरणांमध्ये मिळून एकूण 8.201 टीएमसी पाणीसाठा असून, ही क्षमता 16.97 टक्के आहे. गतवर्षी याच दिवशी चारही धरणांमध्ये मिळून केवळ 4.660 टीएमसी साठा होता, जो 9.64 टक्के होता. यंदा गतवर्षीच्या तुलनेत साठ्यात समाधानकारक वाढ झालेली आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.